Home क्राईम कारण नसतांना तरूणावर चाकूने वार

कारण नसतांना तरूणावर चाकूने वार

0
107

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे काहीही कारण नसतांना एका तरूणाला छोटा चाकूने वार करून छातीवर गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे प्रदिप गोकूळ पाटील वय ४० हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घरी असतांना गावात राहणारा रविंद्र भिमराव पाटील रा. कुवारखेडा याने काहीही कारण नसतांना प्रदिप पाटील याला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करत आहे असा जाब प्रदिपने विचारला. या रागातून रविंद्र पाटील याने हातात लहान चाकू त्याच्या छातीवर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी प्रदीप पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविंद्र भिमराव पाटील रा. कुवारखेडा ता.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound