Home Cities अमळनेर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार


अमळनेर -लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी ।एका 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेची ओळख 2008 मध्ये चारूदत्त विलास पाटील (वय 37, रा. कुऱ्हे काकोडे, ता. मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. चारूदत्तने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या गावी आणि नाशिक येथे वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला आणि महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून महिलेने मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता चारूदत्त विलास पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound