Home आंतरराष्ट्रीय गुगलने लाँचे केले नवीन एआय मॉडेल

गुगलने लाँचे केले नवीन एआय मॉडेल


न्युयॉर्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टेक जायंट कंपनी गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत नवीन मॉडेल जेमीनी 2.0 फ्लॅश थिंनकिग लाँच केले आहे. हे मॉडेल वापरकर्त्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे, कारण ते माहिती तर्कशुद्ध पद्धतीने सादर करते. युजर्सना प्रश्नांची अचूक आणि सोपी उत्तरे मिळण्यासाठी हे मॉडेल लहान पायऱ्यांमध्ये तर्कशृंखला निर्माण करून कार्य करते.

गुगलचे हे नवीन मॉडेल ओपन एआयच्या O3 आणि डीपसीकच्या R1 सारख्या प्रगत AI मॉडेल्सशी थेट स्पर्धा करणार आहे. हे डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्ही प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक सुलभ अनुभव मिळतो.

जेमिनी 2.0 मध्ये काय आहे खास :

तुकड्यांमध्ये समस्यांचे विभाजन: मोठ्या समस्यांना छोटे भाग करून त्यांचे विश्लेषण करण्यात हे मॉडेल उत्कृष्ट आहे.
20 लाख टोकन्सची क्षमता: मोठ्या प्रमाणात डेटा प्रक्रिया करण्याची क्षमता.
कोडिंगसाठी मदत: प्रो आवृत्ती विशेषतः कोडिंगमध्ये उपयुक्त, जी Google सर्चसह थेट एकत्रित होते.
गती आणि अचूकता: इतर मॉडेल्सच्या तुलनेत जलद आणि अचूक प्रतिसाद.

जेमिनी 2.0 फ्लॅश थिंकिंग हे गुगल सर्च, यूट्यूब, आणि गुगल मॅप्स सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्ससह एकत्रित होते. याची प्रो आवृत्ती जेमिनी अ‍ॅडव्हान्स्ड ग्राहकांसाठी विशेषतः उपलब्ध आहे.

विविध प्रकारची मॉडेल्स:

जेमिनी 2.0 Flash: सामान्य वापरासाठी
जेमिनी 2.0 Pro: प्रगत कोडिंग आणि जटिल समस्या सोडवण्यासाठी

जेमिनी 2.0 Flash-Light: किफायतशीर आणि प्रयोगात्मक अ‍ॅप्लिकेशन्ससाठी

सर्व मॉडेल्स जेमिनी अ‍ॅप, गुगल एआय स्टुडिओ, आणि वेअरटेक्स एआय प्लॅटफॉर्मवर वापरता येतील. जेमिनी 2.0 Pro Experimental हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वोत्तम मॉडेल असून, क्वांटम अल्गोरिदमसारखी जटिल कामे अचूकतेने पार पाडू शकते. जेमिनी 2.0 फ्लॅश हे मजकूर, प्रतिमा, ऑडिओ, आणि व्हिडिओ एकाच वेळी प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. यासोबतच, जेमिनी 2.0 Flash-Light हे नवीन किफायतशीर मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. हे मॉडेल आजपासून सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यामुळे एआय च्या क्षेत्रात गुगलचा आणखी एक मजबूत पाऊल पडले आहे.


Protected Content

Play sound