
भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील काशीराम नगरात घरासमोर दुचाकी लावल्याच्या जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाला शेजारी राहणाऱ्या चार जणांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिल्यासचा धक्कादायक प्रकार बुधवारी २२ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील काशीराम नगरात गणेश सिताराम बाविस्कर वय ३४ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. शेजारी राहणाऱ्या शांताराम खेडवणकर त्यांची दुचाकी ही गणेश बाविस्कर यांच्या घरासमोर पार्कीगला लावलेली होती. बुधवारी २२ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता गणेश यांचा भाऊ समाधान याने शेजारी राहणाऱ्यांना दुचाकी लावण्याचा जाब विचारला, त्यावरून दोघांचा वाद सुरू होता, दरम्यान भावाचे भांडण सोडविण्यासाठी गणेश बाविस्कर हा गेला असता त्यावेळी शेजारी राहणारे शांताराम खेडवणकर, सिताराम खडवणकर, शोभा खेडणकर आणि गौरव खेडवणकर सर्व रा. काशीराम नगर, भुसावळ यांनी शिवीगाळ केली आणि गणेशच्या डोक्यात लांखडी रॉड टाकला. या मारहाणीत गणेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता गणेश बाविस्कर याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे शांताराम खेडवणकर, सिताराम खडवणकर, शोभा खेडणकर आणि गौरव खेडवणकर सर्व रा. काशीराम नगर, भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.


