Home क्राईम मोठी बातमी : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू


भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला असून, प्राथमिक तपासात साबुदाण्यासारखा कच्चा माल, जो आरडीएक्स तयार करण्यासाठी वापरला जातो, त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोटामुळे फॅक्टरीच्या त्या विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. फॅक्टरी प्रशासन व स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे. स्फोटाचे नेमके कारण काय होते, याची चौकशी सुरू आहे.

स्फोटाच्या आवाजाने ३ ते ४ किलोमीटरपर्यंत परिसरातील नागरिक भयभीत झाले. अनेक जण कारखान्याकडे धावले, तर काहींनी स्फोटाचे चित्रीकरण त्यांच्या मोबाईलमध्ये घेतले. स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर उडत होता आणि आग लागली होती, ज्यामुळे वातावरणात गोंधळ निर्माण झाला.


Protected Content

Play sound