Home Cities यावल फैजपूरात सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा

फैजपूरात सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा


फैजपूर ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथे नुकताच राष्ट्रीय सहकार भारती स्थापना दिन सप्ताह आणि सहकार महर्षी जे.टी. महाजन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. रक्षा खडसे आणि आमदार अमोल जावळे यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमात ना. रक्षा खडसे यांनी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकारी संस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “देशातील सहकारी संस्था मजबूत करणे आणि त्यांच्याद्वारे रोजगार निर्मिती करणे, हे केंद्र सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संस्था कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करत राहावे.”

प्रमुख वक्ते विवेक जुगाडे यांनी सहकार भारतीच्या स्थापना व उद्देशावर प्रकाश टाकला आणि राज्य सरकार व सहकारी संस्था यामधील सुसंवाद साधून नवीन दिशा देण्याची आवश्यकता सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले, ज्यात त्यांनी सहकारी संस्थांचे महत्त्व आणि त्यांचा देशाच्या विकासात असलेला सहभाग नमूद केला.

कार्यक्रमात राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील, राष्ट्रीय महिला प्रमुख सौ. रेवती शेंदूरणीकर, आमदार अमोल जावळे, शरद महाजन यांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यकमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ए.एस. बडगुजर आणि किरण चौधरी यांनी पार पडली.


Protected Content

Play sound