Home Cities धरणगाव धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची कार्यकारिणी जाहीर


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहर सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व दुकानदार समाज बांधव उपस्थित होते. सलून कामाचे साहित्य चे दर दररोज वाढत आहेत. तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव सुद्धा वाढत असल्याने सलून व्यावसायिक बांधव यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने दाढी कटिंग चे दर वाढवून वीस टक्के वाढ आज करण्यात आली.

सदर बैठकीत अध्यक्षपदी सतीश बोरसे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश झुंजारराव यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी गणेश निकम, सहसचिव गणेश गायकवाड, सेक्रेटरी गोपाळ फुलपगार,खजिनदार दिगंबर निकम,संस्था सदस्य म्हणून संजय झुंजारराव, भूषण वारुडे, सल्लागार आनंद फुलपगार, राजेंद्र फुलपगार, कमलेश बोरसे, राजेंद्र बोरसे,ज्ञानेश्वर झुंजाररांव,दीपक झुंजारराव, किरण गायकवाड, निलेश कुवर, रवी निकम, महेश निकम, संदीप निकम, अजय निकम, गजानन सोनवणे, सुधाकर फुलपगार यांची निवळ करण्यात आली.

सदर बैठकीस किशोर झुंजारराव, समाधान निकम, सचिन झुंजारराव, स्वप्नील झुंजारराव, विशाल फुलपागार, सुभाष बोरसे, दिनेश बोरसे, कैलास झुंजारराव, प्रवीण निकम, राहुल निकम, प्रदीप झुंजारराव, युवराज इंगळे, प्रशांत फुलपागार, महेश फुलपागार, मनोहर निकम यांच्यासह असंख्य समाज बांधव बैठकीस उपस्थित होते..


Protected Content

Play sound