पार्किगमध्ये असलेली दुचाकी लांबवल्याप्रकरणी एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आदर्श नगरातील आराधना अपार्टमेंटमध्ये पार्कींगमधून राहुल निंबाजी बोरसे (वय ३५) यांची २२ हजारांची महागडी सायकल दि. १७ रोजी चोरुन नेली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित शाहरुख अय्युब पटेल (वय २४, रा. फुकटपुरा, तांबापुर) याच्या मुसक्या आवळल्या.

शहरातील आदर्श नगरातील आराधना अपार्टमेंटमध्ये राहुल पाटील हे वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे लहान मुलांची २२ हजार रुपयांची महागडी सायकल आहे. ती सायकल त्यांनी दि. १७ जानेवारी रोजी अपार्टमेंटच्या पार्कींमध्ये लावलेली होती. दरम्यान, चोरट्याने त्यांची सायकल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

यावेळी ही महागडी सायकल तांबापुरा परिसरातील शाहरुख पटेल याने चोरुन नेल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेली सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल चौधरी हे करीत आहे.

Protected Content