खडसे महाविद्यालयातील महिला कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा पार पडली .यात मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी .जी. खडसे महाविद्यालयातील तीन महिला कुस्तीपटूंची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र केसरी गट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यात 62 किलो वजन गटात काजल गजानन पाटील, 68 किलो वजन गटात, वैष्णवी रामदास पाटील ,तर 72 किलो वजन गटात योगिता दिलीप पाटील यांची निवड झाली.

महाराष्ट्र केसरी गट स्पर्धा वर्धा येथे दिनांक 24 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहेत.इया कुस्तीपटूंना क्रीडा संचालक डॉक्टर प्रतिभा ढाके, तसेच कुस्तीपटू नामदेव मोरे, संजय बावस्कर, दिलीप संगेले, बाळासाहेब चव्हाण, विद्यार्थी कुस्ती पटू प्रणय बावस्कर आणि अजय तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल महिलापटूंचे संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ.सी .एस . चौधरी, प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content