आनंदी व समृद्ध जीवनासाठी समुपदेशनाची अतिआवश्यकता – प्रा. नंदकुमार भंगाळे

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सद्यस्थितीत धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला अनावश्यक मानसिक ताण, उदासीनता व नैराश्याला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत योग्य वेळी, योग्य समुपदेशन मिळाल्यास जीवनात आनंद व यशसिद्धी पुन्हा प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणीही दुःखाने खचून न जाता समपदेशन करून घ्यावे असा मौलिक सल्ला प्रा नंदकुमार भंगाळे सहसचिव, तापी परिसर विद्यामन्डळ फैजपूर यांनी दिला. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मानसशास्त्र विभाग व प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम उषा) सॉफ्ट कॉम्पोनंट अंतर्गत आयोजित एकदिवसीय मुले आणि मुली यांना समुपदेशन कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर तापी परिसर विद्या मंडळाचे सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, संजय चौधरी यांच्यासहित कार्यशाळेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. सी. पी. लभाने प्राचार्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाल व बबनराव काकडे प्रांताधिकारी फैजपूर, प्रा डॉ. एस. टी. भुकन अधिष्ठाता शिक्षणशास्त्र विद्याशाखा, प्रा डॉ जगदीश पाटील मानव्य विद्याशाखा, प्रा. पी. डी. पाटील सिनेट सदस्य,प्रा डॉ आशुतोष वर्डीकर भालोद महाविद्यालय, प्रा डॉ प्रीतम कुमार बेदरकर अहमदनगर, प्रा डॉ अपर्णा अष्टपुत्रे छत्रपती संभाजीनगर, यांच्यासहित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, समन्वयक, विद्यार्थी विकास अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कार्यशाळेसाठी उपस्थित विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मयोगी दादासाहेब धनाजी नाना चौधरी, स्वर्गीय कुसुमताई चौधरी व लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस मालर्यापण करण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले. त्यात धनाजी नाना महाविद्यालयाचा ऐतिहासिक वारसा, परंपरा व विद्यापीठाने देवू केलेल्या कोणल्याही विदयार्थी हिताच्या कार्यक्रमाला झोकून देऊन यशस्वी करण्यात प्रयत्नरत असल्याचे मत मांडले व समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे व संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे आभार व्यक्त केले. यासोबत सद्यस्थितीत समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर उद्घाटक बबनराव काकडे प्रांताधिकारी यांनी उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःचा जीवनानुभव सांगून आयुष्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जावे, ध्येय निश्चिती करून कठोर परिश्रमाने व अचूक मार्गदर्शनाने कोणतेही यश साध्य होत असून आयुष्याला अधिक सुंदर करण्यात विद्यार्थ्यांनी झोकून द्यावे असे आवाहन केले. प्रा डॉ एस टी भुकन अधिष्ठाता शिक्षण शास्त्र विद्याशाखा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन रूपा अग्रवाल व कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. तर आभार राधिका सोळंके यांनी मानले.

यानंतर प्रा डॉ अपर्णा अष्टपुत्रे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांनी व्यक्तिमत्व विकास यावर प्रथम सत्र घेतले. प्रा डॉ प्रीतमकुमार बेदरकर विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग अहमदनगर कॉलेज अहमदनगर यांनी मानसिक आरोग्य या विषयावर द्वितीय सत्र घेतले. डॉ कांचन नारखेडे सायक्याट्रीस्ट जळगाव यांनी विवाहपूर्व समुपदेशन यावर तृतीय सत्र घेतले तर प्रा डॉ विना महाजन सहाय्यक प्राध्यापक तथा समुपदेशिका कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी विवाहोत्तर समुपदेशन यावर चतुर्थ सत्र घेतले. चारही सत्रा दरम्यान दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व शंका निरसन करण्यात आले.

मनोगतातून माधुरी भरणे व पौर्णिमा कोळी यांनी सदर कार्यशाळेचा खूपच फायदा झाला असून भविष्यात समुपदेशनाचा उपयोग आयुष्याला समृद्ध करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरिषदादा चौधरी सर्व सन्माननीय पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख प्रा डॉ एस व्ही जाधव, उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ हरीश नेमाडे, डॉ जी जी कोल्हे, समन्वयक प्रा डॉ सीमा बारी, प्रा धीरज खैरे, प्रा. कामिनी पाटील,डॉ सविता वाघमारे,प्रा. प्रिया बारी, प्रा.नयना पाटील,प्रा. पल्लवी तायडे प्रा. विजय तायडे ,डॉ. एम के जाधव यांच्यासहित छाया शिरसाळे, माधुरी भरणे, पौर्णिमा कोळी , सानिका मेढे , दीपक कोळी ,देवयानी महाजन, वैष्णवी पाटील, मेहेक तडवी ,प्रणाली पाटील, पौर्णिमा तायडे ,स्नेहा शेंणगे, अजय सुरवाडे, चेतना पाटील, जयश्री पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content