रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण कारवाई गंभीर गुन्ह्यात फरार झालेल्या मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्हा बडवानी येथील फरार संशयित आरोपी महेंद्र भगवान राठोड याला पालगावातून अटक केली. संशयिताला अटक केल्यानंतर रावेर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. महेंद्र राठोडवर मध्यप्रदेश पोलिसांनी २ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
रावेर पोलिसांना माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील सेंधवा पोलीस स्टेशनचा फरार आरोपी महेंद्र राठोड पाल गावात संशयास्पदरीत्या फिरत आहे. यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत राठोडने सेंधवा पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यात फरार असल्याचे कबूल केले.
या यशस्वी कारवाईचे श्रेय रावेर पोलिसांच्या तपास पथकाला दिले जात आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि फैजपूर विभागाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनी तुषार पाटील, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस शिपाई महेश मोगरे, प्रमोद पाटील आणि महिला पोलीस शिपाई माधुरी सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या यशस्वी कारवाईमुळे रावेर पोलिसांचे कौतुक होत असून, त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून फरार आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे.