Home क्राईम कुटुंबावर अमानुष मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा; चर्मकार महासंघाची मागणी

कुटुंबावर अमानुष मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा; चर्मकार महासंघाची मागणी


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील गाळण येथे मागासवर्गीय कुटुंबातील महिलेसह तिच्या दोन मुलांना चौघांकडुन अमानुष मारहाण करण्यात आली होती. सदर मारहाणीतील संशयीत आरोपींवर कठोर कलमाखाली कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जळगाव जिल्हा अध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, पाचोरा तालुका अध्यक्ष गोवर्धन जाधव, उपाध्यक्ष रमेश पवार, संघटक दिलीप अहिरे उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील गाळण येथील दगुबाई भिकन सावंत यांची ४० ते ५० वर्षांपासून वडिलोपार्जित शेतजमिनीवर अमोल जयराम पाटील, दिलीप जयराम पाटील, भोला जयराम पाटील, तुळशीराम जयराम पाटील रा. गाळण ता. पाचोरा यांनी दादागिरी करुन धमकावुन तसेच बळजबरीने ताबा घेत आहे. दगुबाई सावंत व त्यांच्या मुलांचा अज्ञानाचा गैरफायदा घेवुन शेती बांधावर पिकपेरा कागदोपत्री तलाठी यांच्याकडे दाखविला आहे. या प्रकरणा संदर्भात दगुबाई सावंत यांचेसह त्यांची मुलं सुपडु सावंत व किरण सावंत यांना अमोल पाटील, दिलीप पाटील, भोला पाटील, तुळशीराम पाटील यांनी ७ जानेवारी रोजी सायंकाळी लाठ्याकाठ्यांनी व लोखंडी सळईने अमानुष मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेप्रकरणी सुपडु सावंत यांच्या फिर्यादीवरून वरिल चारही संशयीतांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र संबंधितांवर कुठलीही कारवाई केली जात नसुन संशयीत आरोपींवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अल्ट्रासिटी अॅक्ट १९८९ नुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी स्विकारले आहे.


Protected Content

Play sound