पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरात छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या परिवाराच्या माध्यमातून गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अखंडितपणे छ्त्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक येथे दर सोमवारी दोन्ही स्मारकांच्या परिसरातील स्वच्छता करून दुग्धाभिषेक व पुजा करण्यात येत असते. तसेच थोर महान विभुतींच्या जयंती, व पुण्यतिथी निमित्त देखील विविध उपक्रम, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य विमा शिबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविले जातात.



म्हणून ह्या सर्व कामांची शाब्बासकिची पावती म्हणून राजा शिवछत्रपती परिवाराचे संस्थापक सुनिल सुर्यवंशी व जळगांव विभाग प्रमुख संतोष पाटील यांनी महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातील मावळे, रणरागिणी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचा सन्मान चिन्ह देवुन सन्मानित केले. सन्मान स्वीकारताना छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे प्रविण मोरे, निलेश मराठे, श्रीराम मोरे, कल्पेश मराठे, ज्ञानेश्वर माळी, मनोज चौधरी, सोनु भोई, दिपक भोई, निलेश जाधव, दिपक भोई, महेश पाटील इ. सन्मान स्वीकारत सगळ्यांचे आभार मानले, दोन ते अडीच वर्षांपासून चालु असलेल्या शिवकार्याला संपुर्ण महाराष्ट्रभरातील मावळेच्या उपस्थितीत पहिला अभुतपुर्व सन्मान छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचा करण्यात आला.


