दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात बालपणाच्या आठवणींना उजाळा

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वावडे येथील बी.बी.ठाकरे हायस्कूल दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम रविवारच्या दिवशी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.ए. चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.बी. ठाकरे आणि डी. बी. साळुंखे सर यांनी उपस्थिती लावली. या स्नेहमेळाव्याचे आयोजन आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी ‘कृष्ण-सुदामा आणि सुभद्रा मित्रपरिवार ग्रुप’च्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात विजय पाटील, रामकृष्ण चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, रमेश सुतार, मनीषा पाटील, छाया बोरसे, मधुकर ठाकरे आणि प्रभुदास पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब बोरसे यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. या प्रसंगी शाळेतील सर्व निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, ज्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

Protected Content