जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी महापौर विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी महापौर तथा शिवसेना-उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी विधानसभा निवडणुकीचे मतदान नजीक असतांनाच पक्षांतर करत शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हाच त्यांच्यावर नवीन जबाबदारी येणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आता त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर, विद्यमान जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांना पक्षाने जिल्हा सहसंपर्क प्रमुख बनविले आहे.
विष्णू भंगाळे यांना काल मुंबई येथे जिल्हा प्रमुखपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. लवकरच जळगाव महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमिवर, भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.