यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील विस्तारित वसाहती फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंप समोरील हरीओम नगर मधील फ्लाईट बनवण्याचे दुकानात आज रात्री भीषण आग लागून सुमारे ९ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी भेट देऊन शासकीय पातळीवर आगीचा पंचनामा तलाठी गजानन पाटील यांनी केला.
यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या हरिओम नगरात गट नंबर ५० मधील प्लॉट नंबर पाच मध्ये स्लाईट बनवणाऱ्या दुकानात दिनांक १४ चे पहाटे दोन वाजेचे सुमारास सर्किटने आग लागली पत्रांचे शेड दहा क्विंटल सलाइटिंग ७० दरवाजे यासह मशनरी लाईव्ह आधी जळून खाक झाले. सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.
सर्जरी ग्लास व अल्युमिनियम असे दुकानाचे नाव आहे. दुकान मालक शेख जाकीर शेख कमरोद्दिन आणि शेख अस्लम शेख जाकीर हे आहेत. त्यांनी चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून चार लाख रुपये कर्ज घेतले होते तर दोन महिन्यापूर्वी बडोदा बँकेतून दोन लाख रुपयांचा उचल केलेला आहे असे एकूण सहा लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे. कच्चे मटेरियल धरून दुकानात आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून दुकानाच्या बाजूस असलेल्या अंजली गोपीनाथ सोनवणे यांचा रहिवास आहे. त्यांच्या घरात दुकाना लगतच किचन रूम होते. या किचन रूममध्ये गॅस हंडी आहे. सुदैवाने येथे काही नुकसान झाले नाही. घटनास्थळी यावल नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष इकबाल खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटी देऊन दुकान मालकांच्या झालेल्या नुकसानाबाबत खंत व्यक्त केली. त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.