महाकुंभ मेळ्यात पहिल्या दिवशी दीड कोटी भाविकांनी केले शाहीस्नान

प्रयागराज-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोमवारी पौष पौर्णिमेच्या स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. सोमवारी दीड कोटी लोकांनी गंगेत धार्मिक स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत, कल्पवासी आणि पर्यटकांचे स्वागत केले आणि त्यांना महाकुंभाच्या पहिल्या स्नानासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. योगी यांनी लिहिले आहे की, ‘मानवतेच्या शुभ पर्वामध्ये ‘पौष पौर्णिमे’च्या शुभ प्रसंगी संगमात स्नान करण्याचा मान मिळालेल्या सर्व संत, कल्पवासी, भक्तांचे हार्दिक अभिनंदन. महाकुंभ 2025’. आज पहिल्या स्नान महोत्सवात, 1.50 कोटी सनातन भक्तांनी अखंड आणि स्वच्छ त्रिवेणीत स्नान करण्याचा पवित्र लाभ घेतला.

Protected Content