पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील अहिर सुवर्णकार सोनार समाज पारोळा यांच्यातर्फे आमदार अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पारोळा सुवर्णकार सोनार समाजाचे अध्यक्ष व समस्त कार्यकारिणी यावेळी उपस्थित होते. त्यांना श्री अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रजींची फोटो प्रतिमा शाल श्रीफळ पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष छोटू जडे, उपाध्यक्ष नितीन शेठ रणधीर व समस्त कार्यकारणीतील सदस्यामध्ये अनिल टोळकर, घनश्याम जडे, दिलीप सोनार, अरुण सोनार, शेखर जडे, रवींद्र सोनार, नंदू टोळकर, दीपक रणधीर, सोमनाथ कर, योगेश सोनार यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आमदार अमोल पाटील यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी अमोल पाटील यांनी देखील माझ्या विजयात सुवर्णकार समाजाच्या देखील खारीचा वाटा आहे. येणाऱ्या काळात सोनार समाजाला नक्कीच मदत करीन असे सांगून त्यांनी समाजाच्या व कार्यकारणीच्या उत्साह वाढवला.