वृध्द महिलेच्या बंद घरातील ६० हजारांच्या मुद्देमालाची चोरी; गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुकाराम नगरातील स्वामी नारायण मंदीराजवळ राहणाऱ्या ६७ वर्षीय मालती चंद्रशेखर महाजन यांच्या घरात चोरी झाल्याची घटना रविवारी, १२ जानेवारी रोजी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर बंद असतांना चांदीचे शिक्के आणि रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालती चंद्रशेखर महाजन वय ६७ रा. तुकाराम नगर, स्वामी नारायण मंदीराजवळ भुसावळ या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ ते १२ जानेवारी दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून चांदीचे शिक्के आणि रोकड असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी वृध्द महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे.

Protected Content