यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयात महसूल प्रशासनाच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यावल तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थितांमध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते आणि यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एम.एच. तडवी यांचा समावेश होता.
यावेळी यावल तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सन्मानित पत्रकारांमध्ये अय्युब पटेल, अरुण पाटील, शेखर पटेल, सुनिल गावडे, राजेंद्र तायडे, जीवन चौधरी, सुधीर चौधरी, सुरेश पाटील, मिलींद टोके, समीर तडवी, रंजीत भालेराव, फारूख शेख, प्रमोद वाणी, योगेश सोनवणे, आणि विक्की वानखेडे यांचा समावेश होता. ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले. तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सन्मान सोहळ्यात पत्रकार सुधीर चौधरी, शेखर पटेल, मिलींद टोके, राजेंद्र तायडे, आणि प्रमोद वाणी यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी पत्रकारितेच्या आव्हानांवर प्रकाश टाकत, समाजासाठी पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट केले. यावल तहसील कार्यालयातील हा सन्मान सोहळा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना समर्पित ठरला.