भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने वृध्दाला उडविले

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर पायी जाणाऱ्या एका ७४ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकारे शनिवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव जबरदस्त इंगळे वय-७४, रा. दर्यापूर शिवार, वरणगाव ता.भुसावळ असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, भीमराव इंगळे हे वृद्ध शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ तालुक्यातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर पायी जात होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत भीमराव इंगळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी ११ जानेवारी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रेमचंद सापकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.

Protected Content