शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांकडून नियमांची पायमल्ली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. अधिष्ठाता कार्यालयासमोर “नो पार्किंग” फलक असतानाही महाविद्यालयातील कर्मचारी सुरक्षारक्षकांसमोरच वाहने पार्क करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाहने लावल्यावर सुरक्षारक्षकांकडून त्यांना अरेरावी केली जात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमांचे पालन कसे करणे आवश्यक आहे, तर कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना नियमांची पायमल्ली करण्याची मुभा का मिळते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणावर प्रशासनाकडून कारवाईची मागणी केली आहे.

Protected Content