यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यावर वकील संघाने गंभीर आरोप करत त्यांची कार्यपद्धती चौकशीसाठी जिल्हाधिकारी, फैजपूर प्रांताधिकारी, आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
वकिलांच्या वहिवाट,जन्ममृत्यू सह विविध प्रकरणात युक्तीवाद वेळी साकळी येथे कार्यरत असलेले मंडळाधिकारी यांना दालनात बसवतात आणि तेच वकिलांचे युक्तिवाद हाताळतात,अनेक प्रकरणे रंगाळून ठेवतात सह आर्थिक अपेक्षेचा असा आरोप केला आहे.
साकळी येथे कार्यरत मंडळाधिकारी सचिन जगताप यांना यावल तहसीलदारांच्या न्यायालयीन दालनात बसतात आणि तेच वकीलांचे युक्तिवाद हाताळतात, यामुळे न्यायिक कामकाजात अडथळा आणि अन्याय होत असल्याचा आरोप वकील संघाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान वकील संघाने केलेले आरोप हे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी या सर्व आरोपांना निराधार ठरवत सर्व आरोप फेटाळले आहे.
वकील संघाने मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप केले आहेत. पक्षकारांशी वैयक्तिक संपर्क साधून प्रकरणांच्या निकालांवर प्रभाव टाकल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तहसीलदार युक्तिवाद ऐकण्याऐवजी सतत मोबाईल हाताळत असतात, असे वकील संघाचे म्हणणे.
तहसीलदारांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या तक्रारीवर वकील संघाच्या प्रमुख सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनावर ऍड. नितीन चौधरी (अध्यक्ष), ऍड. आकाश चौधरी (सचिव), ऍड. एस. जी. कवडीवाले, ऍड. राजेश गडे, ऍड. एस. आर. लोंढे, ऍड. खालीद शेख आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. वकील संघाने तहसीलदार आणि मंडळाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्यायप्रक्रियेत ढवळाढवळ आणि बेकायदेशीर हस्तक्षेप करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाने केली आहे.