श्रीमद्भगवताची कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आमदार राजूमामा भोळे

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. श्रीमद्भागवताची कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते. ही कथा मृत्यूचे भय दूर करून आपल्याला देवाकडे घेऊन जाते आणि भक्तीसोबतच आपले ज्ञान आणि अलिप्तता देखील बळकट करते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या चौथ्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी समुद्रमंथन, श्रीराम जन्म व चरित्र कथा सुश्राव्य केली. त्यांनी सीता स्वयंवर कथा सांगितली. रामाचा राज्याभिषेक आणि वनवास, सीतेचे हरण, श्रीराम हनुमान भेट असे विविध राम चरित्रातील प्रसंग सांगितले.

पुतळ्यातील रावण दहन करण्यापेक्षा हृदयातील रावणाचे दहन केले पाहिजे. आग लावण्यापेक्षा आग विझवण्यात श्रेष्ठ असतो. त्यामुळे सत्कर्मामध्ये नेहमी सहभाग घेतला पाहिजे. रावणाने मरताना रामाचे चिंतन केले. प्रत्येकाने राम समजून घेतले पाहिजे, असेही मोरदे महाराज यांनी सांगितले. संध्याकाळी आ. राजूमामा भोळे, डॉ. सतीश शिंदाडकर, दिलबागसिंग छाबडा, माजी नगरसेवक डॉ. विरेन खडके, डॉ. प्रशांत बोरोले, डॉ. चेतन पाटील, अमित लड्ढा, मोहन चौधरी, संतोष वाणी, कांतीलाल सोळंकी उपस्थित होते. उद्या कृष्णजन्माची कथा आणि कृष्णचरित्र सांगण्यात येईल.

Protected Content