जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याचे आजार, विशेषतः कमरेचे दुखणे, सायटिका, पायात मुंग्या येणे, पायाची ताकद कमी होणे अशा मणक्याच्या विविध आजारांवर तपासणी आणि उपचार करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन १० जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे.
तपासणी दरम्यान, गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास, शस्त्रक्रिया देखील केली जाईल. त्यासाठी द स्पाईन फाउंडेशनच्या डॉक्टर्स टीम रुग्णालयात उपस्थित राहणार आहे. अस्थिव्यंग उपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांनी सर्व रुग्णांना या तपासणी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शस्त्रक्रियेसाठी निवडलेले रुग्ण 8 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात येऊ शकतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.