दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत आरोपीला अटक करत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरीला गेलेली दुचाकी ही ज्ञानेश्वर उर्फ नाना भगवान पवार (भिल), रा. ढेकु, ता. अमळनेर याच्याकडे असलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढेकु गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील तपासासाठी संशयित चोरट्याला अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस हवालदार संदीप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, आणि राहुल कोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Protected Content