जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र जळगाव यांच्यातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेउन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १३ जाने २०२५ रोजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगांव नॅशल हायवे नं.६ तंत्र निकेतन समोर जळगाव येथे सकाळी १०-०० वाजता हा मेळावा घेण्यत आला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शिकाउ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून या भरती मेळाव्या करीता जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. तरी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच दहावी बारावी, शिल्प कारागिर योजना, डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर मा.पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास उपस्थित राहुन भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती रा.रा.पाटील यांनी केले आहे.