रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत लाहार येथेील अनुदानित आश्रमशाळेत प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्या संकल्पनेतून शाश्वत आदिवासी भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाच्या अनुषंगाने झालेल्या बीटस्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
आयोजित विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटामधून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमातीच्या सिकलसेल नियंत्रण मॉडेलला द्वितीय क्रमांक मिळाला असून सदर मॉडेलची निवड प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी व पदवीधर प्राथमिक शिक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रकल्प अश्विन सुनील बारेला, दिपक सखाराम पावरा या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.