वृध्दाचे बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गाडगेबाबा नगरात राहणाऱ्या वृध्दाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून ६६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकुमार प्रल्हाद कुळकर्णी वय ७३ हे आपल्या परिवारासह गाडगेबाबा नगरात वास्तव्याला आहेत. २४ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान त्यांचे घर हे बंद होते. यामुळे या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रल्हाद कुळकर्णी यांचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून १ तोळा सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याच्या रिंगा आणि २ तोळ्याचा सोन्याचा चपलाहार असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नंदकुमार कुळकर्णी हे घरी आले तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत त्यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.

Protected Content