भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यात एका सावत्र बापाने १० वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नराधम सावत्र बापाला अटक करण्यात आली असून याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत १० वर्षीय चिमुकली ही आपल्या आईसह कल्याण येथे वास्तव्याला आहे. सहा ते सात महिन्यांपुर्वी पिडीत मुलगी ही आईसोबत भडगाव येथे राहत असतांना तिच्या सावत्र बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. यावेळी पिडीत मुलीचे तोंड दाबून आरडाओरड केली तर तुझ्या आईचा मर्डर करेल अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा १८ जुलै २०२४ रोजी कल्याण येथे मुलीच्या मामांच्या घरी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी मात्र पिडीत मुलीने आरडाओरड केल्यानंतर नराधम बाप घटनास्थळाहून पसार झाला. या घटनेप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भडगाव पोलीसात फिर्याद दिली.त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात नराधम सावत्र बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.