Home Cities जळगाव प्रा. वंदना महाजन यांना डॉक्टरेट, चॅम्पस परीवारातर्फे सत्कार

प्रा. वंदना महाजन यांना डॉक्टरेट, चॅम्पस परीवारातर्फे सत्कार

0
100


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.वंदना महाजन यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आली या निमीत्ताने जळगावात चॅम्पस परीवारातर्फे सत्कार करण्यात आला.

डॉ. महाजन यांना नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते पी एचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.यंत्र अभियांत्रिकी मध्ये मटेरिअल कोटींग्स या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता.आपल्या संशोधनात आटोमोबाईल क्षैत्रात मटेरियल कोटींग्सच्या उपयोगावर माहिती सादर केली आहे.

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे चे प्रा.डॉ.एम.जे.साबळे व रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल नुकताच चॅम्पस परीवाराने सत्कार केला यावेळी त्यांचे पती स्थापत्य अभियंता प्रमोद माळी यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.


Protected Content

Play sound