जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे तर कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते पत्रकार बांधवांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यातील १० जणांना दर्पणकार पुरस्कार
पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार जाहीर आले आहेत. यात प्रिंट मीडियातून चंद्रशेखर जोशी, सुनिल पाटील, सुधाकर जाधव, चेतन साखरे, इलेक्ट्रॉनीक मीडियातून किशोर पाटील, संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियातून नरेंद्र पाटील, निलेश पाटील आणि छायाचित्रकार सचिन पाटील अशा पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक जेष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, जेष्ठ पत्रकार विजय पाठक, दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील, पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा, संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नागराज पाटील, संतोष नवले, खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, महानगराध्यक्ष योगेश चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.