Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
159


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीलाकाहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. हा प्रकार पीडीत मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार रविवारी ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound