धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भोद शिवारातील महावीर कॉटन जिनिंग फॅक्टरीमधून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून ५ लाख ३० हजार ७६० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात संजय समीरमल ओस्तवाल वय 58 रा. धरणगाव यांचे महावीर कॉटन नावाची कापसाचे जिनिंग फॅक्टरी आहे. 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यानच्या काळामध्ये फॅक्टरी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयाच्या खोलीतून 5 लाख 30 हजार 760 रुपये रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी संजय ओस्तवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 10 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहे.