आ. अमोल जावळेंच्या सहकार्याने अखेर आदिवासींसाठी बससेवा सुरू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल-रावेर या तीन तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना कमी खर्चात आणि कमी वेळात सहज प्रवास करता यावा म्हणून या हेतु भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई तडवी (प्रथम लोकनियुक्त सरपंच, परसाडे बु, ता. यावल) यांनी सातत्याने राज्य परिवहन महा मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भगवान जगनोर व यावल आगार प्रमुख डी. बी. महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून सातपुडा आदिवासी एक्सप्रेस’ सुरू करण्या संदर्भात यशस्वी प्रयत्न केले.त्यानंतर आदिवासी एक्सप्रेस च्या मार्गाची चाचपणी करण्यात आली आणि गाडी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.यासाठी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोलभाऊ जावळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आज दि- १ जानेवारी,बुधवार ला नुतन वर्षाचे औचित्य साधून यावल आगारात सकाळी ९ वाजता भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आणि भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते व भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमातीचे उपाध्यक्षा सौ. मीनाताई तडवी,आगार प्रमुख डी.बी.महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपुडा आदिवासी एक्सप्रेस गाडीचे उत्साहाच्या वातावरणात लोकापर्ण करण्यात आले.

मीना तडवी यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रावेर यावल विधान सभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच जळगाव विभागाचे ट्रेनिंगबस चे मास्टर नायकडा साहेब, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिक्षक बंजारा साहेब, जळगाव विभागाचे वाहतूक निरिक्षक बाबू उर्फ संजू तडवी, यावल आगार प्रमुख डी. बी. महाजन, (यावल स्थानक प्रमुख ), जगदिश सोळंके,वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, वाहतूक निरिक्षक सिध्दार्थ सोनवणे,सहा. वाहतूक निरिक्षक खतिब तडवी, वाहतूक नियंत्रक बबलू तडवी, वाहतूक निरिक्षक याकूब तडवी,सहा.कार्यशाळा अधिक्षक तेजस शुक्ला,गाडी चे चालक बी.बी.तडवी,वाहक अफसर तडवी,मन्सूर तडवी (मोहरद) परसाडे ग्रापं.सदस्य.रोशन तडवी, सौ.मदीना तडवी,सौ. खल्लोबाई तडवी,सौ. शकिला तडवी, पो.पा. महेमूद तडवी,युनुस तडवी,गफूर तडवी, सुभेदार तडवी, जहांबाज तडवी, राजू तडवी, यावल आगाराचे सर्व कर्मचारी बंधू भगिनीं यांनी केलेल्या सहकार्या बद्दल आभार मानत . समस्त आदिवासी समाज बांधवांनी सातपुडा आदिवासी एक्सप्रेस’ चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Protected Content