रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल मतदार संघात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे कच्चे रसायन नष्ट केले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आ. अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून लाडक्या बहिणींनी आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले आहे.
रावेर आणि यावल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची आणि पन्नीची दारूविक्री होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान या दारूमुळे काहींना जीव गमावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान आमदार अमोल जावळे हे विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार दौरा करत असताना लाडक्या बहिणींनी दारूबंदी करावी अशी मागणी जावळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार अमोल जावळे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासनाची पूर्तता करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत बैठक घेऊन रावेर आणि यावल तालुक्यात गावठी हातभट्टीची दारू विक्रीवर पूर्णपणे बंद करावी. या संदर्भात गावठी हातभट्ट्या उध्वस्त करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित विभागाने आज रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक भागात अवैधपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्या उध्वस्त केले आहे. दरम्यान या कारवाईमुळे परिसरामध्ये समाधान व्यक्त करत आ.जावळे यांचे आभार मानले आहे.