Home क्राईम बुलेट मोटारसायकल चोरी प्रकरणी तिघांना अटक

बुलेट मोटारसायकल चोरी प्रकरणी तिघांना अटक

bullet chori
bullet chori

bullet chori

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनीतून बुलेट मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, हर्षद दिलीपकुमार नागपाल रा. बाबा नगर, सिंधी कॉलनी यांनी आपल्या दारासमोर 15 मार्च 2019 रोजी पांढऱ्या रंगाची रॉयल इनफिल्ड 350 बुलेट लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी 17 मार्च 2019 रोजी हर्षद नागपाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपासाधिकारी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयित तुषार मदनलाला जोशी यांची कसून चौकशी केली असता त्यांना सदरील बुलेट कारोई जि. भिलवाडा राजस्थान येथे ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर स.फौ. रामकृष्ण पाटील, पोहेकॉ दिनकर खैरनार, पोकॉ सचिन पाटील आदी पथक राजस्थान रवाना झाले. राजस्थान येथून बुलेट दुचाकी ताब्यात घेवून जळगाव येथे आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता किसन गजराम यादव, शुभम गजराम यावद दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, महाजन नगर, तुषार मदनलाल जोशी रा. ममुराबाद रोड या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. दिनकर खैरनार करीत आहे.


Protected Content

Play sound