Home क्राईम अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

alpawayin mulagi
alpawayin mulagi

alpawayin mulagi

जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगर परीसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवशंकर कॉलनी परीसरात इंद्रप्रस्थ नगरातील 15 वर्षीय मुलगी दुकानावर जावून येते असे सांगून 5 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गेली. रात्री 8.30 वाजेपर्यंत घरी आली नसल्याने तिच्या आईवडीलांनी शोधाशोध केली. ती मिळून आली नसल्याने वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविल्याबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राजकुमार हिंगोळे करीत आहे.


Protected Content

Play sound