रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील तहसीलदार यांचे कार्यालयासमोर ९ दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
सुनिल सोपान महाजन रा. चोरवड ता. रावेर व नारायण राणा चारण रा. कर्जोद ता. रावेर यांचेत सन २०१७ पासून रस्ता वाहिवाटी वरून वाद सुरु असल्याने दोघांनी सुमारे ९ दिवसांपासून येथिल तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यामुळे दोघांची प्रकृती दिवसागणिक बिघडत होती. आणि दोघांची प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासना समोर मध्यस्थी करण्यास प्रश्न निर्माण होत असल्याने आणि दोघेही उपोषणार्थिंची प्रकृती खालविली.
यावेळी रावेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, भाजपा केंद्रिय कार्यकारिणी सदस्य सुरेशशेठ धनके यांनी पुढाकार घेऊन आणि सोबत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे नेते सुरेश चिंधु पाटील, माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, ॲड. सूर्यकांत देशमुख, माजी सरपंच नेहता महेंद्र पाटील, माजी उपसरपंच निंभोरासीम राजू सवर्णे, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पंकज वाघ, देशदूतचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत विचवे,ग्राम पंचायत सदस्य अजनाड विजय महाजन, चोरवडचे संजय पाटील आदींनी दोघ उपोषणार्थिंची भेट घेऊन दोघांची समजूत काढून दोघांचे उपोषण सोडविले.