सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थी उमेद किशोर लोखंडे व गजेंद्र आनंदा शिरतुरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आविष्कार-२०२४ च्या स्पर्धेत विज्ञान विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.तसेच त्यांची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य मा.श्री.संजय चौधरी तसेच प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी आविष्कार 2024 चे समन्वयक डॉ. शरद बिऱ्हाडे, डॉ.योगेश तायडे व डॉ.सीमा बारी यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.यावेळी उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव व डॉ.हरीश नेमाडे व प्राध्यापक उपस्थित होते.