कलेशी मैत्री केल्याने माणूस समृद्ध होतो; मैत्र महोत्सवात मान्यवरांचे मत

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कला ही माणसाला समृद्ध करते. त्याच्या आयुष्यात रंग भरते. म्हणून चित्र, संगीत, नाट्यकलांनी जळगाव समृद्ध होत आहे. परिवर्तनच्या कार्यक्रमांनी रसिक समृद्ध होत आहेत असे मत मैत्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी व्यक्त केले.

 

याप्रसंगी जी.एस. टीचे उपायुक्त श्री पी. के. जयशंकर अय्यर, आर्कि. संदीप सिकची, स्टॅम्प ड्युटी विभागाचे अधिकारी सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, आर. टी. ओ. इन्स्पे. संदीप पाटील, जळगाव जनता बँकेचे संचालक सपन झूनझूनवाला, यांच्या सोबत महोत्सव प्रमुख स्वरुप लुंकड, मानसी गगडाणी उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘व्हिन्सेट व्हॅन गॉग’ हे अभिवाचन पुणे येथील कलावंतांनी सादर केले. आयर्व्हीन स्टोन यांनी लेखन केले असून माधुरी पुरंदरे यांनी अनुवाद केलेला आहे. तर संकल्पना, संकलन, दिग्दर्शन शेखर नाईक यांच होतं. धनेश जोशी, सृजना कथलकर, रेणुका चौधरी, शेखर नाईक या कलावंतांनी सुंदर अभिवाचन केलं. याप्रसंगी चित्रकार राजेंद्र महाजन, लिलाधर कोल्हे, विजय जैन, नितीन सोनवणे, यशवंत गरुड, कवी अशोक कोतवाल, उद्योजक प्रेम कोगटा आदी मान्यवर प्रेक्षकांत उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संदीप केदार यांनी केले.

Protected Content