भुसावळ प्रतिनिधी । येथील तापी नदीच्या काठी इंजन घाटावर तापी नदी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तापी मातेचे पूजन पंडित सुरेश शर्मा व गोपाल शर्मा यांनी मंत्रोच्चारच्या विधीने केले. तापीनदीला यावेळी साडी-चोळीही अर्पण करण्यात आली.
अशी मान्यता आहे की, तापी नदी सुर्यपुत्री असून यम व धर्मराज यांची लाडकी बहीण आहे. स्कंदपुराणमध्ये एक उल्लेख असा आहे की, आजच्या दिवशी जो तापी नदीत स्नान करतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते. तापी नदी मध्यप्रदेशाच्या बैतूल भागातून महाराष्ट्र मार्गे सुरत (गुजरात) जात समुद्राला मिळते. या जन्मोत्सवाची परंपरा बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव यांनी वर्ष 2001 पासून विविध समाज बांधवांना एकत्र घेऊन मोठ्या उत्साहाने सुरुवात केली आहे. हा कार्यक्रमात नंदग्राम गोधाम, गो-कृषी पर्यटन क्षेत्र, अंजाळेचे संचालक अभिलाश नागला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदिग्राम गोदामचे विशेष मंहत पं., रवीओम शर्मा, उमाकांत शर्मा, गौरव शर्मा, भारतीय वैष्णव, मेघा वैष्णव, नेवे परिवार, राधाकृष्ण प्रभातफेरीचे सुनील लोहाटी, संतोष कुमार नागला, संजय फालक, अनुप अग्रवाल, अर्जुन पटेल, साधना शर्मा, राज भराडिया, इतर समाज बांधव-भगींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकेश तापी काठी संकट मोचन हनुमान मंदिरात अग्रसेन बुक स्टॉलचे अग्रवाल यांच्यातर्फे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.