जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय, कृषी नगर, अकोला येथील डाँ. के. आर. ठाकरे सभागृहात शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली. सन २०२३-२४ या वर्षात महाबीजने एकूण ५,७६,२१९ क्विंटल बियाणे खरीप/रब्बी व उन्हाळी हंगामात विक्री केलेले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाबीजची एकूण आर्थिक उलाढाल ५३७५६.७४ लक्ष रुपये आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला महाबीज भवन येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषि राज्यमंत्री महाबीजचे प्रथम अध्यक्ष स्व. नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाबीज भागधारकांचे संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजीत सपकाळ व महाबीज विभागप्रमुख उपस्थित होते.
सभास्थळी महाबीजच्या वतिने भागधारकांना महाबीज कृषी उत्पादनांची माहिती होण्याकरिता विविध दालणे थाटण्यात आली होती. त्यामध्ये ऊती संवर्धित केळी, संकरित पपई, मका, चारा पिके खरिप/रब्बी हंगामातील पिक बाण, भाजीपाला बियाणे व प्रात्यक्षीक व माहिती सादर करण्यात आली.
अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आयुक्त रावसाहेब भागडे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख, डाँ रणजित सपकाळ, कृषी विद्यापिठाचे प्रतिनीधी विठ्ठल सरप पाटील महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी रामदास सिध्दभट्टी राष्ट्रीय बीज निगम चे हेमंत चिरमूरकर व महाबीजे विभाग प्रमुख उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर आणि आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे यांनी बीजोत्पादक भागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य निर्णय घेतले. तसेच संचालक वल्लभराव देशमुख व संचालक डाँ रणजीत सपकाळ यांनी भागधारकांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन करुन बीजोत्पादक भागधारकांचे समाधान केले. संचालन जितेंद्र सरोदे यांनी केले तर आभार विवेक ठाकरे यांनी मानले.