जळगाव (प्रतिनिधी): पियुष नरेंद्रआण्णा पाटील यांच्यावर नूतन मराठा महाविद्यायाचे प्राचार्य यांनी बेछूट आरोप केलेले आहेत. विविध सामाजिक संघटनांनी हा आरोप खोटा असल्याने प्राचार्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्रतिभा शिंदे, भगवान मराठे, रवी देशमुख आदी उपस्थित होते. पियुष पाटील हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. रक्तदान, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, असे उपक्रम राबवत असतांना त्याच्यावर खोटे आरोप ठेऊन त्यांस हेतुपुरस्कर त्रास दिला जात आहे. नूतन मराठा महाविद्यायाचे प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी पियुष पाटील यांच्या बदनामीचा कट रचत खोटे-नाटे आरोप करून पियुषला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर कुणाल सांळुखे, राहुल शर्मा, साहिल कटारिया, वैभव काळे , प्रशांत चौधरी, मितेश भदाणे, योगेशराजे निंबाळकर, पवन पाटील, शांतनू नारखेडे सचिन चौधरी, शुभम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.