जळगाव – विशेष प्रतिनिधी | साधारणता एकदा मोबाईल चोरीस गेला तर तो पोलिस स्टेशनला तक्रार करून पुन्हा मिळेल शाश्वती नसते त्यातल्या त्यात रेल्वे प्रवासात तर अनेकांचे मोबाईल चोरीस जातात पण पुन्हा तो मिळण्याची शक्यता फार कमीच…पण जळगावातील न्यायालयात काम करणारे अजितकुमार वाणी यांचा चोरीस गेलेला मोबाईल कल्याण रेल्वे पोलिसांनी परत मिळवून सुखद धक्का दिलेला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जळगाव न्यायालयात नोकरी करणारे अजितकुमार वाणी हे नोव्हेंबर महिण्यात त्यांच्या काही कामा निमित्त मुंबईला गेले होते प्रवासा दरम्यान ईगतपुरी दरम्यान एका चोरटयाने त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरल्याचे लक्षात आल्यावर वाणी यांनी तातडीने कुर्ला रेल्वे पोलिस स्टेशनला तक्रार नोंदली सदर तक्रार नंतर झीरो नंबरने कल्याण रेल्वे पोलिस स्टेशनला वर्ग झाली. कल्याण रेल्वे स्थानकावर कार्यरत सहायक पोलिस फौजदार पुरूषौत्तम कोळी व त्यांच्या सहका-यांनी सदर मोबाईल नंबरचा आय एम ई आयई नंबर वर लक्ष ठेवत संबधीत चोरटयास पकडून वाणी व इतर जणांचे मोबाईल हस्तगत केले.
मोबाईल हस्तगत होताच अजितकुमार वाणी यांना फोन करून मोबाईल मिळाला असल्याची सुचना दिली व तातडीने आवश्यक त्या कागदपत्राांचाी पुर्तता करून घेत अजितकुमार वाणी यांचा मुलगा प्रणय वाणी यांना कल्याण रेल्वे पोलिस स्थानकातील सहायक पोलिस फौजदार पुरूषौत्तम कोळी यांनी परत करत वाणी कुटुबियांना सुखद धक्का दिला.
कल्याण पोलिसांचे चोरीस गेलेला मोबाईल परत मिळवून देण्याचा प्रयत्न इतरही पोलिस स्थानकांनी अंगिकारावा अशी अपेक्षा होत आहे.