जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरांमधील किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा अत्यंत उत्साहात साजरी झाली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारे अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली.

नर्सरी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच नर्सरी च्या चिमुकल्याण पासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारचे अभिनय साजरे करण्यात आले. तशाच प्रकारे प्रत्येक पालकांनी व शिक्षकांनी यामागे चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा अत्यंत उत्साहात साजरी झाल्याबद्दल पालकांकडून व शिक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षा होत आहे. तसेच शाळेचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच पालकांना शुभेच्छा दिल्या.

Protected Content