भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एका हॉटेल व्यवसायिकाला जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवण्यास येत असताना जुन्या मीटरमध्ये फेरफार असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल तयार करण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावदा येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्या लाईनमन व तंत्रज्ञ या तिघांना जळगाव लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहे. त्यांच्या हॉटेलमधील लावलेले जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. दरम्यान नवीन मीटर बसवल्यानंतर जुन्या मीटर मध्ये फेरफार केल्याचे दाखवून साकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी सावदा येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, (वय 42 वर्ष रा, हुडको कॉलनी भुसावळ),
लाईनमन संतोष सुकदेव इंगळे (वय 45, रा मल्हार कॉलनी फैजपुर) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी, (वय 39, रा. अयोध्या नगर भुसावळ) यांनी सुरुवातीला २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तडजोडी अंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने आज छापा टाकून लाईनमन संतोष सुकदेव इंगळे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी याप्रकरणी पैशवर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.