अजितदादा एकदा नक्कीच मुख्यमंत्री होतील : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे. दरम्यान सत्तापदांवरील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानताना अजित पवारांचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीसांनी केलेला उल्लेख ऐकताच सभागृहात सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाकांवर हशा पिकल्याचं पाहायला मिळाले. या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री.. दादा काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा.. असे आमचे अजित पवार आणि आमच्यासोबतच्या घटकपक्षांनी एकत्रपणे दिलेल्या सहका-यामुळे हा मोठा विजय आम्हाला मिळाला असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर अनेक मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. पण त्याचप्रमाणे हलक्या-फुलक्या वातावरणात एकमेकांना काढलेल्या कोपरखळ्या आणि खोचक विधानंही सभागृहाच्या कामकाजातून चर्चेत आल्याचे दिसून आले. आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अशाच प्रकारे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महायुतीतील मित्र उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही राजकीय चिमटे काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम राज्यातील जनता आणि महायुतीतील घटकपक्षांचे आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या विजयाबाबतची आकडेवारी मांडून हा ऐतिहासिक विजय ठरल्याचेही नमूद केले. नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतले हे माझे पहिले भाषण आहे. म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचे आभार मानतो. त्यांनी आमच्या महायुतीला घवघवीत यश दिले. २३७ आमदार सत्तापक्षाच्या बाजूने निवडून आले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Protected Content