जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगावच्या बीएस्सी चतृर्थ सत्राच्या विदयार्थ्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या डायलेसिस आणि एआरटी सेंटरला भेट देवून माहिती जाणून घेतली.
आपल्या या भेटीत केंद्रात प्रदान केलेल्या सुविधा, ऑपरेशन्स आणि सेवांचे मूल्यांकन करणे, आरोग्य सेवा मानकांचे पालन सुनिश्चित करणे आणि रुग्ण सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे. हा उददेश डोळयासमोर ठेवून डायलेसिस विभागाचे कार्य,सुविधा आणि कामकाजाचे व्यवस्थापन इ माहिती तर एआरटी सेंटर येथे एच आय व्ही एडस रूग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधा, पध्दती तसेच सेवा प्रदान करतांना कशी काळजी घेतली पाहीजे यांची माहिती घेतली.
डायलेसिस विभागात रूग्णालयाच्या रविंद्र बोरसे यांनी तर एआरटी सेंटर येथे डॉ.कल्पना पंडीत मेडीकल ऑफीसर यांनी माहिती दिली. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,रूग्णालय व्यवस्थापक प्रा. एन जी चौधरी यासह गोदावरी नर्सिंगचे प्रा रितेश पडघन, प्रा सचिन पवार हे उपस्थीत होते.