जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. वडोदकर मेडिकल फाउंडेशन व रोटरी क्लब जळगाव गोल्डसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कावीळ निदान व चिकित्सा शिबिराचा शुभारंभ मीरा आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र, महाबळ बसस्टॉप येथे रोटरीचे सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके यांच्याहस्ते धन्वंतरी पुजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. संपूर्ण जुलै महिनाभर चालणार्या या शिबिराचा कावीळीने ग्रस्त व तशी लक्षणे असणार्या रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
17 वर्षांची परंपरा असलेल्या या शिबिराचा उद्देश व प्रास्ताविक वडोदकर फाऊंडेशनचे सचिव डॉ. सुभाष वडोदकर यांनी केले. स्वागत रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष संजय दहाड यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. प्रणिता वडोदकर, राहूल कोठारी यांनी परिश्रम घेतले. पंकज अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, विनायक बाल्दी, प्रखर मेहता, प्रशांत कोठारी, अशोक जैन, नीलेश जैन, उज्वल कोठारी, डॉ.काजल फिरके, सुरेंद्र गाबा तसेच रोटरी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.